सांगली : अभिमानास्पद! शिराळा नगरपंचायतीने फडकवला १०० फूट लांबीचा भव्यदीव्य नेत्रदीपक तिरंगा

सांगली : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच सांगलीतील शिराळा नगरपंचायतीने एक अप्रतिम उपक्रम राबविला आहे. देशाभक्तीचा नारा अखंड सुरु ठेवण्यासाठी शिराळा नगरपंचायतीने भव्यदीव्य नेत्रदीपक तिरंगा आज फडकवला. १०० फूट लांबीचा आणि ६७ फूट रुंदीचा तिरंगा फडकावल्याने शिराळ नगरपंचायतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिराळा येथील कार्यक्रमात सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमावेळी शिराळा शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन जगजागृती रॅली काढली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'प्रत्येक घरी तिरंगा' अभियानानं जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानात जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेला १०० फूट लांबीचा आणि ६७ फूट रुंदीचा तिरंगा विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलात आणि अभिमानाने फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देवून मानवंदना दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply