लाेणावळा पाेलिस सतर्क, लाेहगडावर जमावबंदी आदेश लागू

लाेणावळा : लोहगड किल्ला येथे उद्या (शुक्रवार) हाेणा-या उरूस साजरा हाेऊ देणार नाही असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. यामुळे उरुसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच विराेध हाेत असल्याने शेकडाे नागरिक लाेहगडावर जाण्याची शक्यता असल्याने लोणावळा पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

मावळातील लोहगड हा किल्लाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेला हा लोहगड किल्ला. या गडावर सहा मजारी तयार करण्यात आल्या आहेत. याचा इतिहासाची काहीही संबंध नाही. आणि या मजारी अधिकृत करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून उरूस साजरा केला जातो असा आराेप विश्व हिंदू परिषदने केला आहे.

या उरुसामुळे पशुपक्ष्यांना हानी निर्माण होते इथल्या पाण्याच्या टाक्या अशुद्ध होते. त्यामुळे या उरुसाला आमचा विरोध आहे असे बाळासाहेब सांडभोर यांनी नमूद केले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अनेक वेळा उरूस बंद करा यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

दरम्यान लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याच्या उरुसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हाेणारी गर्दी लक्षात घेता तसेच उरुसाला हाेणार विराेध लक्षात घेता लोणावळा पोलिसांकडून सर्वप्रकारे खबरदारी घेतली जात आहे.

त्यासाठी लोहगडाच्या परिसरात आजपासून (गुरुवार) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply