राज्यात आजपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून गुरुवारपर्यंत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडे वातावरण राहणार आहे. त्या भागात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, रविवारी विदर्भातील अकोला येथे 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी मध्य महाराष्ट्राचे सरासरी तापमान 38 अंशांवर होते; तर विदर्भात पारा मात्र 41 ते 43 अंशांवर गेला होता.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply