देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भूपेन बोरा हे 22 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. बोरा यांच्यासह बरेच काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आसामध्ये काँग्रेसला मोठा बसणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भूपेन बोरा भाजपमध्ये प्रवेश करणार
समोर आलेल्या माहितीनुसार, भूपेन बोरा यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र वरिष्ठ नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला असल्याचे समोर आले होते. राहुल गांधी देखील त्यांना फोन केला होता अशीही माहिती समोर आली होती. मात्र आज ते भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. बोरा यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी आणि मुलाने आरती करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
हिमंता सरमा काय म्हणाले?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी म्हटले की, ‘राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बोरा यांना पक्षात घेण्यासाठी आधीच मान्यता दिली आहे. भाजपमध्ये त्यांचे स्वागत आहे. भूपेन बोरा यांना आदर दिला जाईल. भाजपमध्ये सामील होणे त्यांच्यासाठी घरवापसी असेल, कारण हा पक्ष त्यांच्यासारख्या लोकांसाठी आहे जे त्यांच्या वडिलांच्या राजकारणाचा वारसा पाळत नाहीत.’
भूपेन बोरा यांनी काय म्हटले?
आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी आज सकाळी बोलताना म्हटले होते की, मंगळवारी रात्रीपर्यंत राजीनामा मागे घ्यायचा की नाही याबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तसेच जवळच्या सहकाऱ्यांशी आणि लखीमपूर जिल्ह्यातील लोकांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचेही बोरा म्हणाले होते. दरम्यान, गेल्या काही काळापासून बोरा हे पक्षांतर्गत कलहामुळे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. आता ते भाजपमध्ये सामील होणार असल्याचे समोर आले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel