मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉय पराभूत; उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या अँगसची मात

पीटीआय, क्वालालम्पूर : भारताचा तारांकित बॅडमिंटन पटू एचएस प्रणॉयची मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमधील विजयी घोडदौड शनिवारी हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने रोखली. पुरुष एकेरीच्या तीन गेमपर्यंत रंगलेल्या उपांत्य सामन्यात प्रणॉयने निसटता पराभव पत्करला.

प्रणॉयने पहिला गेम जिंकत आशा निर्माण केली. परंतु अँगसने नंतर सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. प्रणॉयने एक तास आणि चार मिनिटे झुंज दिल्यानंतर २१-१७, ९-२१, १७-२१ अशा फरकाने सामना गमावला.

याआधीच्या आठ सामन्यांपैकी दोघांनी प्रत्येकी ४-४ जिंकले होते. परंतु यापैकी अखेरचे तीन सामने जिंकणाऱ्या प्रणॉयचे पारडे जड मानले जात होते. परंतु अँगसने या विजयानिशी सरशी साधली. शुक्रवारी पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. आता प्रणॉयच्या पराभवानिशी भारताचे या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात आले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *