भाजपा महाराष्ट्र : भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई शहराध्यक्षपद आशिष शेलारांकडे

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आज अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. कारण आज दिल्लीतून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई शहराध्यक्ष पदावर कोण असणार या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं आहे तर मुंबई भाजपचे अध्यक्षपद हे आशिष शेलार यांच्याकडे असणार आहे.

राज्यभरातील आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी अत्यंत महत्वाच्या असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मागिल अनेक दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply