
पुणे : मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील ‘टीओडी’ झोनच्या (ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन) रखडलेल्या नियमावलीस अखेर राज्य सरकारकडून गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे महामेट्रो आणि पीएमआरडीए यांनी हाती घेतलेल्या तीन मेट्रो प्रकल्पांच्या मार्गावरील रखडलेल्या बांधकामांचा विकास मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच हा निर्णय घेताना मान्य एफएसआय व्यतिरिक्त अधिकचा एफएसआय वापरण्यास परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या प्रीमिअम शुल्कात देखील सरकारने कपात करून दिवाळी भेट दिली आहे.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गावर महामेट्रोकडून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर ‘पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरावा, यासाठी मेट्रो मार्गांच्या स्टेशनच्या परिसरात प्रीमिअम शुल्क आकारून चारपर्यंत एफएसआय देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठीची स्वतंत्र प्रारूप नियमावली राज्य सरकारकडून तयार करून प्रसिद्ध करण्यात आली होती. या नियमावलीनुसार निवासी बांधकामांसाठी रेडी-रेकनरमधील दराच्या ६५ टक्के, तर व्यावसायिक बांधकामासाठी रेडी-रेकनरच्या दराच्या ७५ टक्के शुल्क आकरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकारकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या; मात्र २०१९ ती अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. चार वर्षानंतरही या नियमावलीस राज्य सरकारने कडून मान्यता न मिळाल्याने जवळपास निम्म्या शहराचा विकास रखडला होता.
गरवारे कॉलेज ते आनंदनगर या पाच किलोमीटरच्या अंतरात मेट्रो धावण्यास सुरुवात झाली. डिसेंबरपर्यंत महापालिकेपर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर एक एप्रिलपासून शहरात होणाऱ्या प्रत्येक दस्तनोंदणीवर एक टक्का मेट्रो सेसची वसुली देखील सुरू झाली. दहा दिवसांपूर्वी मेट्रो स्टेशनच्या विकासासाठी किती एफएसआय वापरावा, या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेत आदेशही काढले. परंतु टीओडी नियमावलीस मान्यता न दिल्यामुळे त्यास मान्यता कधी मिळणार असा प्रश्न विचाराला जात होता. आज अखेर या नियमावलीस राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली.
प्रीमिअम शुल्कात अखेर कपात
टीडीओ झोनच्या परिसरात मान्य एफएसआय व्यतिरिक्त प्रीमिअम शुल्क आकारून रस्तारुंदीनुसार जादा एफएसआय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र प्रीमिअम शुल्क दर जादा असल्याने ते कमी करावेत, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातून होत होत. तशी हरकती देखील नागरिकांकडून नोंदविण्यात आल्या होत्या. अखेर राज्य सरकारने नियमावलीस मान्यता देताना प्रीमिअम शुल्काच्या दरातही कपात करून बांधकाम व्यावसायिकांना दिला आहे. तसेच ही कपात करताना सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार हे शुल्क निश्चित केले आहे. त्यामुळे या झोनमध्ये वाढीव एफएसआय वापरून ६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिका बांधणार असेल, तर जमिनींच्या दराच्या तीस टक्के आणि ६० चौरस मीटरच्या वरील सदनिका अथवा निवासी बांधकांसाठी ३५ टक्के प्रीमिअम शुल्क करण्यास परवानगी दिली आहे. तर यातून जमा होणाऱ्या शुल्कापैकी पन्नास टक्के रक्कम महामेट्रोला, तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम महापालिकेने पायाभूत सुविधांसाठी खर्च करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
टीओडी झोन म्हणजे काय?
टीओडी म्हणजे ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन. मेट्रो स्टेशनच्या पाचशे चौरस मीटर परिसरात हा झोन असून या झोनमध्ये रस्तारुंदीनुसार मान्य एफएसआय व्यतिरिक्त चारपर्यंत एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे. वाढीव एफएसआयसाठी प्रीमिअम शुक्ल आकरले जाणार आहे
निवासी झोनमध्ये सध्या १.१० एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी आहे. टीओडी झोनमध्ये या व्यतिरिक्त प्रीमिअम शुल्क भरून अधिकचा एफएसआय वापरता येणार आहे. तो रस्तारुंदीनुसार असणार आहे. तो पुढील प्रमाणे ः
रस्त्याची रुंदी किती एफएसआय वापरून बांधकाम करता
येणार
९ ते १२ मीटर २.५०
१२ ते १५ मीटर ३.००
१५ ते २४ मीटर ३.५०
२४ मीटर आणि त्यापुढे ४.००
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

