पुणे : पुणे शहरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला. सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला. शिवाजीनगर केंद्रावर रात्री अकरापर्यंत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी हलका पाऊस झाला होता. दुपारी मात्र पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. संध्याकाळी ढगाळ स्थिती निर्माण झाली. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाचा शिडकावा सुरू झाला. या काळात शहर आणि परिसरात आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग निर्माण झाले. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरावर सुमारे ७ ते ११ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले. त्यामुळे साडेनऊनंतर मात्र पावसाने जोर धरला. दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
रात्री बारापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळांतच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. तासाभरात शहरातील जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनेही रस्त्याने चालविणे कठीण झाल्याने संपूर्ण शहरच ठप्प झाले. पाऊस सुरू होताना घराबाहेर असलेले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सुमारे दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. काही भागांत भिंती कोसळण्याचेही प्रकार झाले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहराच्या विविध भागांत झाडे आणि फांद्या कोसळण्याचे प्रकार झाले. शहराच्या विविध भागांतून अग्निशमन केंद्रांत दूरध्वनी येत होते. रात्री बारानंतरही पाऊस कायम होता. अरबी समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि स्थानिक स्थितीमुळे शहरात पावसाचा जोर वाढला. कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील हा शहरातील या हंगामातील पहिला पाऊस ठरला. शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel