पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये अफूच्या बोंडाचा चुरा जप्त ; राजस्थानमधील एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

पुणे : विश्रांतवाडी भागात अफूच्या बोंडांच्या चुऱ्याची (पाॅपीस्ट्राॅ) विक्री करणाऱ्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून सहा किलो ७९० ग्रॅम अफूच्या बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला आहे. करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय ३८, रा. सिद्धार्थनगर, धानोरी, मूळ रा. दुरासनी, जि. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

राजपुरोहित अफूच्या बोेंडांच्या चुरा विक्री करण्यासाठी विश्रांतवाडी भागात येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत अफूच्या बोंडांचा चुरा आढळून आला. राजपुरोहित याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चुऱ्याची किंमत ८९ हजार ४९० रुपये आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply