पुणे : सोसायटीच्या आवारात धूम्रपानास मनाई केली म्हणून महिलेला मारहाण; तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : सोसायटीच्या आवारात धूम्रपानास मनाई केल्याने महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी एका तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शुभम कुलकर्णी, पूजा पटवा तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला सुरेश जाधव (वय ४२, रा. साईगंगा सोसायटी, उंड्री) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव रात्री दहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारातून जात होत्या. त्या वेळी कुलकर्णी, पटवा आणि दोघे जण सोसायटीच्या आवारात धूम्रपान करत होते. जाधव यांनी सोसायटीच्या आवारात धूम्रपान करू नका, असे त्यांना सांगितले.

या कारणावरुन चौघांनी जाधव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘सोसायटीची तू मालक आहेस का?, तुझ्या घरी येऊन धूम्रपान करू का ?’ असे म्हणून कुलकर्णीने जाधव यांचा हात ओढला. जाधव यांच्या डोक्यात दगड मारण्यात आल्याने त्या जखमी झाल्या. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करत आहेत.



हे पण वाचा-
“पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर तसं झालं नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल,””; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply