पुणे : मोदींच्या दौऱ्यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड; आंदोलनं रोखली!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातल्या देहू इथं येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहराला पोलीस छावणीचं स्वरुप आलेलं आहे. पोलिसांनी बंदोबस्त कडक केला असून कसून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. दरम्यान, याठिकाणी होणारी आंदोलनं रोखण्यासाठी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.

पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मारुती भापकर आज रेल्वे लाईनग्रस्तांच्या प्रश्नाप्रकरणी आंदोलन करणार होते. आपण वारंवार पत्र लिहून, मंत्र्यांकडे मागण्या करुनही दखल घेतली नसल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यामुळे पंतप्रधानांच लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं भापकर म्हणाले होते.
 
मात्र आंदोलन करण्याआधीच पिंपरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. लोकशाहीत मला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तरीही पोलीस मला आंदोलन करू देत नाहीत, असं सांगत भापकरांनी पोलीस स्टेशनमध्येच लाक्षणिक आंदोलन सुरू केलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply