पुणे : मित्राच्या भावाला मारहाणीतुन सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलवारीने वार करुन खुन

पुणे - प्रेयसीच्या संबंधाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण होत असल्याचे पाहुन त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या मित्रावर प्रेयसीच्या मामाने तलवारीने वार करुन खुन केला. हि धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता लोकामन्य नगर येथील पोस्ट ऑफिससमोर घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकास अटक केली असून 5 ते 6 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद उर्फ गणेश रविंद्र गायकवाड (वय 21, रा. गणेशमळा) असे खुन झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तुकाराम मारुती दारवटकर (वय 41, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर माउली मारुती दारवटकर (वय 41, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता), पौर्णिमा रविंद्र भरगुडे (वय 22, रा. लोकमान्य नगर) यांच्यासह 5 ते 6 जणाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल शांताराम वाळज (वय 22, रा.भुकुम) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता फिर्यादी व त्यांचा मित्र राज असे दोघेजण लोकामन्य नगर येथे फिर्यादीची प्रेयसी काम करीत असलेल्या दुकानामध्ये गेले होते. ते दोघे तेथील व्यवस्थापकाशी प्रेयसीसमवेत काही संबंध आहेत का ? याची विचारणा करीत होते. त्यावेळी प्रेयसीने तिचे मामा तुकाराम व माउली दारवटकर यांना तेथे बोलावले. त्यावेळी त्यांच्यासह 5 ते 6 जण तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र राज पवार या दोघांना शिविगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा, फिर्यादी यांचा मावसभाऊ रोहित मुळे व त्याचा मित्र गणेश गायकवाड तेथून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यामुळे ते दोघे भांडणे सोडविण्यासाठी तेथे आले. त्यावेळी तुकाराम दारवटकर याने त्याच्याकडील छोट्या तलवारीने फिर्यादीवर वार केला, तो वार फिर्यादीने चूकविला. त्यानंतर राज पवार व गणेश गायकवायड या दोघांनी तुकाराम दारवटकर यास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुकाराम दारवटकर याने त्याच्याकडील तलवार गणेशच्या छातीत घुसविल्याने गणेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *