पिंपरी-चिंचवड : अनियमितपणे कर्जाचं वाटप, पिंपरीतील सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 सदस्यांविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील श्री आनंद सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 सदस्यांवर फसवणूक आणि बँकिंग रेग्युलेशन एॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योग्य कागदपत्रे न तपासता काही कंपनींना अनियमित पणे कर्ज दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सनदी लेखापाल गणेश सदाशिव काकडे यांच्या तक्रारीवरुन चिंचवड पोलिसात श्री आनंद सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद बँकेचे कर्जदार मारुती निवृत्ती नवले, निमको ऍडव्हरटायझिंग अँड एन्टरटेन्मेंट लिमिटेड, निमको हॉटेल अँड रिसॉर्ट लिमिटेड निमको ट्रेडर्स लिमिटेड यांना योग्य कागदपत्रे न तपासता अनियमित पणे कर्ज दिल्यामुळे श्री आनंद सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मारुती नवले आणि काही संस्थाना 74 कोटी रुपयांचं अनियमित कर्ज देऊन फसवणूक केल्याचा ठपका सनदी लेखापाल गणेश कानडे यांनी ठेवला आहे. आता या प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply