पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:वास्तविकतेपासून दूर जाऊ नका,‎हे मुलांना समजावणे गरजेचे‎

जगातील सर्वच दिवे प्रकाश देण्यासोबतच धूरही सोडतात. प्रकाश हवा‎‎असेल, तर धूर सहन करण्याची तयारीही ठेवा. केवळ सूर्यप्रकाश असा‎‎आहे ज्यात धूर नसतो. त्यातील उष्णताही आरोग्यासाठी आवश्यक ठरते.‎‎आज आपल्या हातात ‘सोशल मीडिया’ नावाचा एक दिवा आहे.‎‎दिवसाचे ९ ते १० तास स्क्रीनवर घालवणारी मुले या दिव्यापासून प्रकाश‎‎कमी घेतात व होरपळून जास्त निघत आहेत. मुलांच्या आयुष्यात दोन‎‎मोठे धोके निर्माण झाले आहेत. पहिला ती कुटुंबापासून दूर होत आहेत‎‎आणि दुसरे म्हणजे, ती खऱ्या जगापासून तुटत आहेत. आयुष्यात‎‎‘फँटसी’ काही काळासाठी आवश्यक असू शकते, परंतु वास्तवाचा‎‎सामना करणे आणि वास्तवात जगणे हेच जीवनाचे खरे सत्य आहे. अशा‎‎वेळी मुलांना हे कसे समजावून सांगायचे की वास्तव नाकारू नका?‎‎त्यांना एक गोष्ट नक्की सांगा की, सर्वात मोठे वास्तव म्हणजे ‘आत्मा’‎‎आणि त्याचे पुढचे पाऊल म्हणजे ‘परमात्मा’. सोशल मीडियासारख्या‎‎विध्वंसक शक्तीपासून मुलांनी स्वतःला कसे वाचवावे, यासाठी त्यांना‎‎आत्म्याचा आस्वाद चाखायला शिकवले पाहिजे. आत्म्याचा हा‎ आस्वाद‎‘ध्याना’तून मिळतो.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *