मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद प्रभाकर ओक याने ऐतिहासिक कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’कडून अधिकृत मान्यता मिळवली आहे. एका मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा एकमात्र अभिनेता म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा विश्वविक्रम 14 जानेवारी 2026 रोजी अधिकृतरीत्या प्रमाणित झाला आणि त्याची नोंदही करण्यात आली. ही गौरवपूर्ण नोंद 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या, गाजलेल्या मराठी चित्रपट ‘धर्मवीर’मधील प्रसादच्या उल्लेखनीय अभिनयासाठी आहे. या चित्रपटासाठी प्रसाद ओकने चार-पाच नाही तर तब्बल 15 मानाचे पुरस्कार पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.
‘धर्मवीर’ या चित्रपटात प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली. लोकसेवेसाठी आयुष्य वेचलेलं, जनमानसात देवतुल्य स्थान असलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. हा चित्रपट 2022 मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. त्यानंतर त्याच्या सीक्वेलनेही अधिक बळकटी दिली. या सन्मानाबाबत बोलताना प्रसाद ओक म्हणाला, “मी नि:शब्द आहे. हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. माझ्या संपूर्ण टीमचा- लेखक, दिग्दर्शक, माझं कुटुंब, प्रेक्षक आणि मला पुरस्कार देणाऱ्या सर्व परीक्षकांचा मी मनापासून आभारी आहे. शीर्षक भूमिकेत काम करण्याची संधी मला एखाद्या चित्रपटातून तरी मिळेल, असं मी स्वप्न पाहिलं होतं. धर्मवीर हा माझा 96वा चित्रपट होता आणि हजारो लोकांसाठी देवतुल्य मानल्या जाणाऱ्या आनंद दिघे यांची भूमिका साकारणं ही जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली.”
“मी आनंद दिघे यांना वैयक्तिकरित्या कधी भेटलो नव्हतो; मात्र त्यांचे फोटो आणि त्यांच्याजवळील लोकांशी झालेल्या संवादांमधून त्यांच्या चालण्याची ढब, बोलण्याची शैली आणि हावभाव यांचं बारकाईने निरीक्षण करून मी सविस्तर नोंदी तयार केल्या. चित्रपटाला मिळालेलं प्रेम, माझ्या अभिनयाचं झालेलं कौतुक आणि आलेले असंख्य अभिनंदनाचे फोन हे सगळं अविस्मरणीय होतं. राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची थोडी खंत राहिली; पण मी प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम केलं, हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे. देवाची कृपा माझ्यावर आहे,” अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रसाद ओकने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’कडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्काराइतकंच मानाचं’ असं संबोधलं आहे. हा जागतिक सन्मान केवळ प्रसाद ओकच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरत नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणारा ठरतो. मराठी सिनेमाची वाढती ताकद, कलात्मक खोली आणि जागतिक प्रभाव यांचा हा ठोस पुरावा आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel