Presidential elections 2022: नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तारीख आज, गुरुवारी निवडणूक आयोगाने घोषित केली. १८ जुलै रोजी मतदान घेण्यात येईल. तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. २९ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक तारखेची घोषणा केली. १८ जुलै रोजी मतदान होईल. २१ जुलै रोजी मतमोजणी होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणुकीत मतदानासाठी विशिष्ट शाई असलेला पेन पुरवण्यात येईल. मतदान करण्यासाठी १, २, ३ असे लिहून पसंती दर्शवावी लागेल. पहिली पसंती न दर्शवल्यास मत रद्द ठरवले जाईल. कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी करता येणार नाही. संसदेत आणि विधानभवनांमध्ये मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. याशिवाय कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले.
तत्पूर्वी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. मागील वेळी १७ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाली होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना मतदान करता येत नाही. लोकप्रतिनिधीच या निवडणुकीत मतदान करू शकतात.
विधान परिषदेच्या सदस्यांनाही मतदानाचा अधिकार नाही. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विधान परिषदेचा सदस्य असेल तर, त्यांनाही या निवडणुकीत मतदान करता येत नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 'सिंगल ट्रान्सफरेबल वोट' प्रणालीद्वारे मतदान होते. याचाच अर्थ राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेचा एक सदस्य एकच मत देऊ शकतो.
शहर
महाराष्ट्र
- Shahapur : आमदार- खासदार विरोधात आक्रोश; ग्रामसभेत ग्रामस्थांनी दर्शविली नाराजी
- Vaishnavi Hagawane : क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं
- Ladki Bahin Yojana : २६५२ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडक्या बहिणीचे पैसे; सरकार करणार कारवाई
- Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट