“दोन हजाराच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला, त्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात ”, भाजपा खासदाराची मोठी मागणी

भजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, अशी मोठी मागणी केली आहे. भाजपातूनच आता दोन हजार रुपयांच्या नोटेवर आक्षेप घेतल्याने आणि रद्द करण्याची मागणी केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर आता मोदी सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुशील मोदी म्हणाले, “ज्या लोकांकडे २००० रुपयांची नोट आहे त्यांना बँकेतून त्या नोटा बदलण्याची सुविधा द्यावी आणि ठराविक कालावधीनंतर बाजारातून दोन हजार रुपयांची नोट बंद करावी.”

“अमेरिका, चीन, जपान अशा जगातील विकसित देशांमध्ये कोठेही १०० च्या पुढील चनल नाही. मग भारतात दोन हजार रुपयांच्या नोटेची गरज का आहे?” असा प्रश्न सुशील मोदींनी विचारला.

“भारतात एक हजार रुपयांची नोट बंद करण्यात आली आहे, ५०० रुपयांचीही नोट आहे. त्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटची गरज नाही,” असं मत सुशील मोदींनी व्यक्त केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा नष्ट करण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी निश्चलनीकरणाचा मोठा निर्णय घेतला होता. यानुसार, ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री १२ वाजल्यापासूनच या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती.

या निर्णयानंतर काही दिवसांनी ५०० रुपेय आणि २००० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काही काळाने भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा छापणं बंद करण्यात आलं आहे. असं असलं तरी २००० रुपयांची नोट अधिकृत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply