बनावट ड्रायव्हिंग लायसन्स धारकांसाठी कठोर नियम ; तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना?

ड्रायव्हिंग लायसन्स: अलीकडच्या काळात मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) अधिक कडक करण्यात आला आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 5 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्याचप्रमाणे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन वाहन चालविण्याचे कठोर नियम असून त्यात दंडासह शिक्षेची तरतूद आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या वैधतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही येथे नमूद केलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स खरं आहे की बनावट हे जाणून घेऊ शकता.

प्रत्येक तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 2019 मध्ये एका कार्यक्रमात देशातील प्रत्येक तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट असल्याचे सांगितले होते. नवीन मोटार वाहन कायद्याबद्दल माहिती देताना ते म्हणाले होते की, यामुळे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बंद होतील, तसेच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत कारण आता ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

बनावट परवान्यांमुळे रस्ते अपघातात वाढ - NCRB च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक रस्ते अपघात हे वाहन नीट चालवता न येणाऱ्या वाहनचालकांमुळे होतात. हे लोक बनावट परवान्याच्या माध्यमातून वाहने चालवतात. आरटीओकडून (RTO) वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी एक चाचणी घेतली जाते ज्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवावी लागतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply