ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. गद्दारी घालवण्यासाठी जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलडाण्यात चिखली येथील जाहीर सभा, शेतकरी मेळाव्या पार पडला.

आज नवस फेडायला गेलेत काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार. तुमचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं अशी स्थिती त्यांची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

संविधान दिनी काय बोलायचं हा प्रश्न आहे. मात्र संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. पुढची वाटचाल आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी करावी लागेल. हुकूमशाही आपल्याला नकोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

दसरा मेळावा शिवतिर्थावर झाला तेव्हाच ठरवल होतं, मुंबई बाहेर पहिली सभा होईल ती बुलढाण्यात जिथे जिजाऊंचे जन्मस्थान आहे तिथेच घेईन. ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर आई जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply