जालना : हृदयद्रावक..मुलास वाचवायला गेलेला पिताही बुडाला; बाप– लेकाचा मृत्‍यू

जालना : मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी बाप लेकांची बुडाल्याची घटना दुपारी पाचच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शोधकार्य सुरू केले. तासाभराच्‍या शोधकार्यानंतर बाप लेकाचा मृतदेह बाहेर काढले. 

माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा आकाश निर्वंळ आपल्या तीन नातेवाईकासह मोतीतलाव परिसरात पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना १४ वर्षाचा मुलगा बुडत असल्‍याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या बाप ही बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने या बाप लेक बुडाल्याची घटना घडलीय. या घटनेने परिसरात एकच खबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोतीतलाव परीसरात मोठी गर्दी केली आहे. पोलिसानी अग्निशमन विभागाने कळविल्‍यानंतर घटनास्थळी चंदणझिरा पोलिसांसह अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानाच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात गळ टाकून बाप लेकाचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढले. त्यांना वैधकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply