जळगाव : पॅनकार्ड अपडेटच्‍या नावाने फसवणुक; खात्‍यातून काढले २५ हजार रूपये

जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी व्‍यापाऱ्याची २५ हजार रूपयात फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील अभय सुभाष सांखला (वय 47) हे मधुबन अपार्टमेंटमध्ये आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ८ डिसेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून बँक खात्याला पॅनकार्ड जोडण्याचे सांगितले. सांखला यांच्याकडून मोबाईलवर ओटीपी विचारून त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने २५ हजार रुपये लंपास केले.

दरम्‍यान १२ डिसेंबरला सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख करीत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply