
गुजरात : मुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बीएसएफ जवानाला सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जवानाचा जागीच मृत्यू झाला. ही संतापजनक घटना गुजरातमधील वणीपुरामा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
मेलजीभाई वाघेला असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. वाघेला हे बीएसएफ 56 मेहसाणामध्ये कर्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, नडियाद तालुक्यातील वाणीपुरा गावातील शैलेश उर्फ सुनील जाधव याने काही दिवसांपूर्वी बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांच्या मुलीचा अश्लिल व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
या प्रकरणाबाबत बीएसएफ जवान मेलजीभाई, त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईक शैलेशच्या घरी पोहोचले आणि कुटुंबाची खरडपट्टी काढली. त्यावेळी शैलेश घरी नव्हता. तुम्ही मुलाची बदनामी करत आहात, असे आरोपीच्या कुटुंबीयांनी जवानाला सांगितले.
यादरम्यान आरोपी तरुणाच्या नातेवाईकांनी मेलजीभाई यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर लाठ्या-काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत मेलजीभाई यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले.
याप्रकरणी मेलजीभाई यांच्या पत्नी पत्नी मंजुलाबेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर परिसरातून संतापज व्यक्त केला जात आहे. बीएसएफ जवानाच्या पश्चात पत्नी, 3 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


