कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील बेराजगारी वाढली; सर्व्हेक्षणातून माहिती समोर

नवी दिल्ली : जून 2021 मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरी भागात बेरोजगारी वाढल्याचे भारत सरकारने मान्य केले आहे. यामुळे 2020 च्या तुलनेत सुधारत असलेली रोजगाराची स्थिती पुन्हा बिघडली आहे. एनएसओच्या सांख्यिकी विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. NSO च्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) च्या त्रैमासिक बुलेटिनमध्ये (एप्रिल-जून 2021) आकडेवारी प्रकाशित केली आहे. सर्वेक्षणात देशातील शहरी भागातील 43,892 शहरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांची संख्या 1,70,187 इतकी होती. (Unemployment Rate In India) यासोबतच सरकारने कोविड दरम्यान, विशेषत: पर्यटन क्षेत्रातील गमावलेल्या नोकऱ्यांचा वेगळा आकडा जाहीर केला आहे. लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, कोविड दरम्यान 2020 पासून आतापर्यंत एकूण 2.15 कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या असून, महामारीच्या पहिल्या लाटेत 1.45 कोटी लोकांनी, दुसऱ्या लाटेत 52 लाख आणि तिसऱ्या लाटेत 18 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्याचे सरकारचे मत आहे. प्रकाशित आकडेवारीनुसार 2021 मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान देशातील एकूण बेरोजगारीचा दर 9.4 टक्के होता, परंतु एप्रिल ते जून या कालावधीत बेरोजगारीचा दर 12.7 टक्के झाला. एप्रिल-जून 2020 च्या तिमाहीत हा दर 20.9 टक्के होता. या सर्व परिस्थितीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी-मार्च 2021 तिमाहीत पुरुषांमधील बेरोजगारीचा दर 8.7 होता. परंतु एप्रिल-जून 2021 तिमाहीत तो 12.2 पर्यंत वाढला. त्या तुलनेत महिलांमधील बेरोजगारीचा दर 11.8 वरून 14.3 पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे, कामगार दल सहभाग दर (LFPR) 57.5 टक्क्यांवरून 57.3 टक्क्यांवर आला आहे. LFPR म्हणजे एकूण लोकसंख्येतील लोकांचे प्रमाण जे एकतर एखाद्या रोजगारात आहेत किंवा एखाद्या रोजगारासाठी इच्छुक आहेत. त्यात नोकरदार आणि बेरोजगार दोघांचाही समावेश आहे. एप्रिल-जून 2020 या तिमाहीत हा दर 55.5 टक्के होता. याच काळात, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (WZWJ) किंवा UPR 52.5 टक्क्यांवरून 50.3 टक्क्यांवर घसरले आहे. UPR ची व्याख्या नोकरीत असलेल्या व्यक्तींची टक्केवारी म्हणून केली जाते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply