कात्रज परिसरातील नागरिकांसाठी न्याय-हक्क मागणाऱ्या आंदोलकांवरच पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे: कात्रज परिसरातील 25 वर्षांपासून सहन करत आलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. कात्रजमध्ये अनेक समस्यांना सामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवरच पोलिसांना लाठीचार्ज  केला आहे. त्यामुळे न्याय-हक्क मागितल्यावर लाठी मिळेल का असा सवाल आंदोलनकर्ते विचारतायत.

कात्रजकडे पाठ फिरवलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे उपोषण करत असल्याचे बाबर यांनी सांगितले आहे. कर भरूनही कात्रज परिसरात सुविधांचा मोठा अभाव आहे. पाण्याच्या मोठ्या समस्येला कात्रजकरांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात पाण्याच्या आठ टाक्या असूनही पाण्याची मोठी समस्या मोठी आहे. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बाबर यांनी केला आहे. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा नाही. त्यांचा विकास कसा करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय कात्रज चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याकडे कुणाचे लक्ष नाही. जोपर्यंत कात्रजमधील नागरिकांच्या समस्या दूर होत नाहीत तो पर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे बाबर यांनी सांगितले आहे. मात्र यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply