कल्याणमध्ये शिवसेनेचं हटके आंदोलन; महावितरण कार्यालयात लाईट, पंखे बंद करून पेटवल्या मेणबत्त्या

कल्याण : राज्यात कोळसा टंचाई आणि उष्णतेच्या लाटेमुळे वीजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वीजग्राहकांना भारनियमनाची  झळ सोसावी लागत आहे. अदानी पॉवर्स कंपनीने केलेल्या कमी वीजपुरवठ्यामुळे आणि केंद्र सरकारच्या नियोजनाच्या चुकांमुळे वीज टंचाई झाली. असा आरोप उर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. तसंच भारनियमन कधीपर्यंच राहील याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात भारनियमनाचं संकट आणखी गडद होणार का ? असा प्रश्न वीजग्राहकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेनेनं महावितरण कार्यालयात लाईट, पंखे बंद करुन मेणबत्त्या पेटवत अनोख आंदोलन केलं. मलंगड भागात सुरु असलेल्या अघोषीत भारनियमनामुळं शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या दालनात लाईट, पंखे बंद करून मेणबत्त्या पेटवत अनोखं आंदोलन केलं.

दरम्यान राज्यात सुरु असलेल्या वीजटंचाईवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी राऊत म्हणाले, माध्यमांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले, देशात वीजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास २७ राज्यांमध्ये लोडशेडींग सुरु झालं. त्यापैकी ९ राज्ये मोठे राज्ये आहेत. महाराष्ट्र सुध्दा यापासून वंचीत राहिलेला नाही. उष्णतेचं तापमान एप्रिलमध्ये वाढायच्या ऐवजी फेब्रुवारीतंच वाढलं आहे. हे त्त्यामागचं कारण आहे. त्यानंतर कोविडमधून सर्व फ्री झाले आणि निर्बंधही हटवले. त्यानंतर व्यापार, उद्योगधंदे १०० टक्के सरु झाल्यानं त्याचा परिणाम वीजेवरही झाला. सप्टेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळं कोळशाच्या खाणीत पाणी शिरलं.तसंच कोळसा टंचाईवर लोकांनी आंदोलनही केलं. डिझेलचे दर वाढले. त्यामुळे कोळसा खाणीतून रेल्वेने कोळसा आणण्यात तफावत झाली. केंद्रिय कोळसा मंत्रालयाने सुद्धा रेल्वे मंत्रालयाकडे बोटं दाखवलं.

केंद्र सरकारच्या नियोजनाच्या चुकांमुळे ही वीज टंचाई झाली. अचानकपणे अदानी पॉवर्सने तिरोडा प्लॅंटमधला थोडासा पुरवठा बंद केला. ३१०० मेगा वॉटचा पीपीए करार आहे. पण त्यांनी १७६५ मेगावॅटचा सप्लाय केला. जेएसडब्लूकडून आम्हाला १०० मेगा वॉट वीज मिळायची ती सुद्धा मिळाली नाही. कारण त्यांचा प्लॅंट बंद झाला. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. वीज कंपन्या बंद आहेत त्यामुळे आमच्यावर ताण राहणार आहे, नागरिकांना विनंती आहे की, विजेच्या वापरात काटकसर करावी. भारनियमनाचं शेड्यूल वृत्तपत्रात, मेसेजवर आणि वाट्सअॅपवर नागरिकांना दिलं जाईल. १५०० मेगावॉट वीज उपलब्ध झाल्यावर आम्ही भारनियमन बंद करु. असंही नितीन राऊत यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply