उल्हासनगरमधील मशिदींमध्ये आजचं अजान भोंग्यांशिवाय

उल्हासनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाले आहेत. ४ मे नंतर जर भोंग्यावर कारवाई झाली नाही तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. याच पार्श्वभूमिवर आज काही ठिकाणी मनसैनिकांनी अजान सुरु होताच समोर हनुमान चालीसा भोंग्यावरुन लावल्याचे प्रकार पहाटोपासून पाहायला मिळत आहेत.

मात्र, उल्हासनगरमध्ये वेगळ चित्र पाहायला मिळालं आहे. येथील मशिदींनी आजचे अजान भोंग्यांशिवाय केलं आहे. उल्हासनगर शहरात १० शहरामध्ये मशिदी असून यातील कोणत्याही मशिदीवर भोंगे वाजले नसल्याने कुठेही सामाजिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून उल्हासनगरमधील मशिदींनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मुंबईतील इतर भागात मात्र तणावाचं वातावरण असून आज राज्यभरात मनसैनिक भोंग्याबाबात आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे.

तसंच आज पनवेलमध्येही आजचं अजान लाऊडस्पीकरवर न होता फक्त तोंडाने बोलून झाली असून राजसाहेबांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेकडून सर्व मुस्लिम बंधूंचे आणि पनवेल शहर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखायला मदत केली याबद्दल आभार माणण्यात आले. मात्र पुढेही अशीच अजान लाऊड स्पीकरवर न देता तोंडी द्यावी, जर या पुढे भोंग्यावरुन अजान दिली गेली तर हनुमान चालीसा सुद्धा भोंग्यावर ऐकावी लागेल असा इशाराच मनसेच्या पनवेल महानगर शहराध्यक्ष योगेश जनार्दन चिले यांनी दिला आहे. दरम्यान, मुंबई मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आज पहाटे चार वाजल्यापासून संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply