आकाशात दिसलेल्या ठिपक्यांच्या रेषेशी थेट इलॉन मस्कचा संबंध; अकोला, चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसला अनोखा नजारा

आज रात्रीच्या वेळी आकाशामध्ये एक ठिपक्यांची रेषा दिसून आली. ही रेषा पुढे-पुढे जात होती. अनेकांनी याचे व्हीडिओ केलेले आहेत. काहींनी एलियन पृथ्वीवर आल्याची आवई उठवली. मात्र या धावणाऱ्या रेषेचा संबंध थेट ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांच्याशी असल्याचं पुढे येत आहे.

रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आकाशात एक धावती चमकणारी रेषा दिसली. बुलडाण्याच्या मलकापूर तालुक्यातील तळेगाव शिवारातील काही तरुणांना आकाशातून रॉकेट सदृश्य ट्यूबलाईट सारखी वस्तू आकाशातून जाताना रात्री आठ वाजताच्या सुमारास दिसले. यावर अनेकांनी आकाशातून रेल्वे कशी काय जाऊ शकते असे प्रश्न विचारून कुतूहल निर्माण केले यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

चंद्रपुरातही संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. बीडमध्येही ही ठिपक्यांची ट्रेन स्पष्टपणे दिसली.

मात्र ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून इलॉन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे. भक्कम इंटरनेट जोडणीसाठी अवकाशात अशा प्रकारच्या 55 सॅटेलाईटची एक ट्रेन सोडण्यात आली असून, तीच चंद्रपूरच्या आकाशात दिसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. आकाशात अशाप्रकारे ही स्कायट्रेन भविष्यात अनेकदा दिसू शकते, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं. अनेकांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply