आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२: मधुमेह असणाऱ्यांनी श्वसनासंबंधीचा योगा अशाप्रकारे करा

मुंबई : आपण दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे व्यायाम, योगासने किंवा जीमचा वापर करतो. आपले आरोग्य सुधारावे यासाठी आपण नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतो.

योग श्वासोच्छवासाच्या व्यायामावर आणि ध्यानावर आपले लक्ष केंद्रित करते. योग करण्याचे अनेक फायदे आहे. मधुमेह असणारे रुग्ण आपल्या आहाराबरोबर आरोग्याच्या बाबतीत सतत चिंतेत असतात. गोडाचे कमी प्रमाणात सेवन किंवा बदलेल्या आहारामुळे त्यांची सतत चिडचिड होणे, श्वसनासंबंधी अनेक तक्रारी उद्भवणे हे व अशा अनेक आरोग्याच्या तक्रारी सुरु असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी श्वसनासंबंधीच्या तक्ररारी कशा दूर करायच्या हे जाणून घ्या.

१. श्वास घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त विचार हा फुफ्फुसाचा करतो. खोल श्वास घेताना आपले संपूर्ण लक्ष हे छाती व पोटाच्या दरम्यान असणाऱ्या स्नायूंवर केंद्रित करतो. आपली नैसर्गिक हालचाल ही आपल्या शरीरातून हवेचा प्रवाह नियंत्रित करते, ज्यामुळे आपण श्वास घेताना ते आपल्या शरीरात खोलवर जाण्यास मदत करते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खोलवर श्वास घेऊन तो सोडल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

२. प्राणायामामध्ये श्वास घेताना आपली एक नाकपुडी बंद करुन एकाच नाकपुडीने श्वास घेतला जातो. अनुलोम विलोम हा प्राणायाम मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उत्तम आहे. हा प्राणायम केल्याने श्वासोच्छवासाचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. तसेच ताण तणावाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

३. उज्जायी प्राणायाम केल्याने श्वासासंबंधीच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. या प्राणायामामध्ये नाकातून इनहेलेशन आणि उच्छवास दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात. श्वास घेताना व सोडताना आपले तोंड बंद ठेवल्यास आपल्या घश्यापासून तोंडापर्यंत आकुंचित करा. असे केल्याने छाती व पोटाच्या दरम्यान असणाऱ्या स्नायूंवर श्वास नियंत्रित ठेवता येते. यामुळे घोरण्याचे प्रमाण कमी होते तसेच एकाग्रता सुधारण्यास आणि तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply