अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील १२ वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू ; ६४ दिवसांची झुंज अपयशी

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील १२ वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे. या मुलीवर अमरावतीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील १२ वर्षाच्या मुलीवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. २५ एप्रिल रोजी या मुलीला कोविड हॉस्पिटलला उपचारासाठी भरती करण्यात आले होते. या मुलीला अन्य आजार ही होते. त्यात तिची कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली. त्यानंतर तिच्यावर कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. १९ मार्च नंतर कोरोनामुळे हा पहिला मृत्यू जिल्ह्यात झालेला आहे. सध्या कोरोनाची स्थिती पाहता जिल्ह्यात कोणताच रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह नाही. मात्र या मुलीला कोरोनाची लागण कुठून आणि कशी झाली याचा तपास आरोग्य यंत्रणा करीत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा १७,८०१ इतका झाला आहे

कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण ९८.७४ टक्के इतकं आहे. तर गेल्या २४ तासांत देशात २,४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *