अमरनाथ यात्रा 2022 : अमरनाथमध्ये पवित्र गुहा परिसरात ढगफुटी, ८ जणांचा मृत्यू

अमरनाथ यात्रा 2022 : अमरनाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाली असून येथे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटी झालेल्या भागामध्ये अनेक भाविक अडकले असून बचावकार्य सुरु आहे. या यात्रेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. पवित्र अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटरवर ही ढगफुटी झाली आहे.

अमरनाथ गुहेच्या परिसरात आज संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे पाणी आल्यामुळे येथे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला तर दोन पुरुष भाविकांचा समावेश आहे. या घटनेनंतर गुहा परिसरात अनेक यात्रेकरू अडकले असून एनडीआरएफ तसेच एनडीआरपीच्या जवानांकडून बचावकार्य केले जात आहे.

या घटनेबाबात काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. “पवित्र गुहेच्या परिसरात ढगफुटी झाल्यामुळे गुहेच्या पायथ्याशी असलेले काही टेंट पाण्यात वाहून गेले आहेत. जखमी झालेल्या भाविकांना हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे,” असे विजय कुमार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पर्वतांमधून जोरदार हवा तसेच पावसामुळे भाविकांचे २५ टेंट वाहून गेले आहेत. तर पावसामुळे येथील परिसरात पाणी साचलेले आहे. सध्या एनडीआरएफ तसेच यायटीबीपीच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply