अकोला : जिल्हा रुग्णालयात होणार टेस्ट ट्यूब बेबी; राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार

अकोला : लग्‍नानंतर अनेक वर्ष अपत्‍य होत नसलेल्‍या दाम्पत्यांसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुढाकार घेत टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यास येत्या सहा ते सात महिन्यांत ही सेवा सुरू होऊ शकते.

लग्नानंतर आई- बाबा व्हावं; असं प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र काही कारणांनी अनेकांच्या पदरी हा सुखद क्षण येत नाही. त्यावर पर्याय म्हणून अनेकजण 'टेस्ट ट्यूब बेबीचा मार्ग निवडतात. मात्र, हा मार्ग खर्चिक असल्याने अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहतात. अशा दाम्पत्यांसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुढाकार घेत टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यास येत्या सहा ते सात महिन्यांत ही सेवा सुरू होऊ शकते. असा उपक्रम राबविणारे अकोला राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरेल.

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री- रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे गत काही महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये पाच शस्त्रक्रिया कक्ष राहणार आहेत. या पाच कक्षांपैकी एक है 'टेस्ट ट्यूब बेबी' असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या माध्यमातून अनेक दाम्पत्यांचे आई- बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply