सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सोबत जयंत पाटीलही, राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

image

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मंत्रिमंळाची बैठक पार पडली. ही बैठक झाल्यानंतर काही तासातच सुनेत्रा पवार ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले पार्थ आणि जय पवार हे उपस्थित होते आणि काहीवेळातच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील हे त्या दालनात गेले आणि या सर्वांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना आता या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही बैठक होताच सुनेत्रा पवार ह्या दिल्लीला रवाना झाल्या असून त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *