“सक्तीचं धर्मांतर गंभीर मुद्दा” सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सक्तीचं धर्मांतर हा गंभीर मुद्दा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. या समस्येवर केलेल्या उपाययोजनांबाबत आठवड्याभराच्या आत माहिती देण्यासही केंद्र सरकारला सांगण्यात आलं आहे.

“देशात सक्तीचं धर्मांतर होत असेल, तर हा खरंच गंभीर मुद्दा आहे. याचा परिणाम देशाच्या सुरक्षेसह नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होऊ शकतो”, असं न्यायमूर्ती एनआर शाह आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

“सक्तीचं धर्मांतर रोखण्यासाठी केंद्राने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. अन्यथा देशात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. या प्रकरणात केंद्राने लक्ष घालणं गरजेचं असून न्यायालयाने काय कृती करावी हे केंद्रानं सुचवलं पाहिजे”, असे न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे.

देशातील सक्तीच्या धर्मांतराच्या मुद्द्यावरुन दिल्लीतील भाजपा नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *