मुंबई: शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूच्या भुंखंडाऐवजी पर्यायी जागा देण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महापालिकेकडे केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तसं पत्र मुंबई महापालिकेला दिलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाची व्याप्ती वाढत असल्याने स्मृतिस्थळाला लागूनच असलेल्या आपल्या ताब्यातील भूखंडावर आमचे उपक्रम राबवण्यास अडचणी येतायत, असं कारण RSS ने दिलंय. त्यामुळे नाना नानी पार्कजवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचं आरेखन करून देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलीय. (RSS's demand for alternative plot in Shivaji Park; Difficulties to RSS in carrying out activities)
1755 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भुखंडाचं भाडं 2007 पर्यंत आरएसएसच्या वतीने भरलं जात असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय. 1967 सालापासून हा भूखंड ऐच्छिक जमीन हस्तांतरण करारांतर्गत महापालिकेने RSS ला बहाल केल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुंबई महापालिकेला पत्र:
जी/ उत्तर विभाग दादर (प) शिवाजी पार्क येथील १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे प्रशासकीय कारणामुळे थकीत भाडे (VLT RENT) स्विकारण्याबाबत...
मुंबई - ४००००१
महोदय,
जी/ उत्तर विभाग दादर (प) शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावे व्ही.एल.टी. तत्वावर १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा वर्ष १९६७ पासून महापालिकेने दिलेला आहे. वर्ष १९६७ पासून वर्ष २००७ पर्यंत आम्ही मोकळ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे भूभाडे (VLT RENT) भरलेले आहे. त्याच्या पावत्या सोबत जोडत आहोत. प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांनी वर्ष २००८ पासून भूभाडे घेण्यापूर्वी जागेचे आरेखन करण्यासाठी आग्रह धरल्याने व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आजतागायत जागेचे आरेखन न झाल्याने प्रशासकीय कारणास्तव वर्ष २००८ पासून आजतागायत भूभाडे थकीत आहे. आम्ही हे भूभाडे भरण्यास तयार आहोत व यापूर्वीही वारंवार भूभाडे भरण्यासाठी प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांच्याकडे गेलो असता ते आरेखनाशिवाय स्विकारण्यास असमर्थता दर्शवली. या एकाच कारणामुळे भूभाडे थकीत राहिले आहे..
वर्ष १९३६ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन शाखा शिवाजी पार्क मैदानात लागते. वर्ष १९६७ पासून VLT भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वितरित केलेला आहे. या १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे भूभाडे वर्ष २००७ पर्यंत भरलेले आहे. या व्ही.एल.टी. भूखंडाचा मालमत्ता कर ०१.०४.१९६७ पासून वर्ष २०२१-२२ पर्यंत भरलेला आहे. याबाबत कागदपत्रे सोबत जोडीत आहोत.
आमच्या सध्याच्या VLT भूखंडाजवळ स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसेच स्मृती स्थळामुळे जागेचे आरेखन करणे जिकीरीचे होईल असे वाटते. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही आपणांस विनंती करतो की,
१) सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारण्यात यावे.
२) स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


