मुंबई : सर्वात मोठी बातमी! 1 जुलैला होणार फडणवीसांचा शपथविधी? सूत्रांची माहिती

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. अशातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. दुसरीकडे भाजपने देखील आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. अशातच देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 1 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सत्तास्थापन करण्यासाठी अधिक वेळ दवडणार नाहीये. विशेष बाब म्हणजे जर उद्या बहुमत चाचणी झाली तर ती चाचणी महाराष्ट्रातील जनतेला लाईव्ह पाहता येणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी उघड मतदान होणार असून गुप्त मतदान होणार नाही असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 39 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं संख्याबळी कमी झालं असून त्यापैकी 16 आमदारांवर पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आमदार अपात्रतेसंबंधी याचिकेचा निर्णय लागेपर्यंत बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्ट घेऊ नये, अशी मागणी मविआतर्फे करण्यात आली होती.

मात्र कोर्टानं ती अमान्य करत, बहुमत चाचणीत काही पेचप्रचंग उद्भवल्यास तुम्ही कोर्टात दाद मागू शकता, असे म्हटले होते. बंडखोर आमदारांच्या परतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ठाकरे सरकारला अचानकपणे फ्लोअर टेस्टला सामोरे जावं लागणार, यातील काही पेचप्रचंगांवरून ठाकरे सरकार कोर्टात धाव घेऊ शकते.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply