मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; पाच जखमी!

मावळ : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात अंडा पाॅईट याठिकाणी आज रात्री सव्वाआठच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. एक्सप्रेसवेवर दैनंदिन होत असलेले अपघात आणि वाहतूककोंडी यामुळे वाहनचालक प्रवासी हैराण झाले आहेत.अपघातग्रस्त नागरिकांना वाहनांमधून बाहेर काढत खोपोली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *