काळ पुढे सरकतो, तसतसा भारत पुढे जात आहे, प्रगती करत आहे, पण फक्त लोकसंख्येच्या बाबतीत नव्हे तर जागरुकतेच्य बाबतीतही भारतात लोकं खूप पुढारलेले दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, आतापर्यंत व्हॅलेंटाईन वीकमध्ये फुलं, चॉकलेट आणि विविध भेटवस्तू यांची सर्वाधिक विक्री व्हायची. पण आता त्याऐवजी कंडोमसह अनेक सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्ट्सच्या विक्रीत वाढ झाली आहे. या वर्षी या उत्पादनांच्या झालेल्या विक्रीने 2025 चा विक्रमही मोडला आहे.
मोठा रेकॉर्ड मोडला
सध्या बहुतांश लोक हे अनेक गोष्टी ऑनलाइन ऑर्डर करत असतात. क्विक कॉमर्स ॲप्सच्या ताज्या अहवालानुसार, 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्ट्सच्या विक्रीचे आकडे खूपच धक्कादायक आहेत. इन्स्टामार्टच्या एका नवीन अहवालानुसार, यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोकांनी 2025 चा रेकॉर्ड मोजाल, 2025 तुलनेत त्यांनी तिप्पट जास्त सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्ट्स ऑर्डर केली.
व्हॅलेंटाइन डे 2026 ला भारत कोण-कोणत्या गोष्टी केल्या ऑर्डर ?
एका रिपोर्टनुसार, कंडोमपासून ते इतर इंटिमीटी उत्पादनांपर्यंत, या कॅटॅगरीमध्ये वर्षानुवर्षे तिप्पट वाढ झाली आहे. पूर्वी लोक या सर्व गोष्टींबद्दल उघडपणे बोलत नव्हते, परंतु आता या बदलावरून असे दिसून येते की लोक या विषयांबद्दल मोकळेपणाने विचार करत आहेत आणि या गोष्टी पूर्वीसारख्या निषिद्ध वगैरे मानत नाहीत.
ब्युटी आणि पर्सनल केअर मध्येही वाढ
फक्त सेक्शुअल वेलनेस नव्हे तर ब्युटी आणि पर्सनल केअर सेक्शनमध्येही मोठी वाढ पाहण्यात आली. रिपोर्टनुसार, अहवालानुसार, व्हॅलेंटाईन डेसाठी कार्टमध्ये बाथ, बॉडी आणि मेकअपशी संबंधित वस्तू सर्वात जास्त दिसल्या. कटकमधील एका ग्राहकाने एकाच ऑर्डरमध्ये 15 हजार 093 रुपये किमतीचे मेकअपचे सामान खरेदी केलं. तर सुरतमधील दुसऱ्या एका ग्राहकाने 10 हजार 845 रुपयांचे हेअर केअर, बाथ आणि बॉडी प्रॉडक्ट्स मागवली.
दिल्ली- मुंबईला या शहरांनी टाकलं मागे
तसेच चॉकलेट आणि टेडी बेअरची डिमांडही कमी नव्हती. कोलकातामधील एका माणसाने 25 हजार रुपयांचे चॉकलेट ऑर्डर केले. टेडी डे होता तेव्हा सॉफ्ट टॉयच्या विक्रीत 568 टक्के वाढ झाली. व्हॅलेंटाईन डे कार्ड विक्रीच्या बाबतीत बंगळुरूने तर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या शहरांनाही मागे टाकलं.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


