पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात NCP महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण

पुणे: पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी महागाई विरोधात राष्ट्रवादी कोंग्रेस NCP) आंदोलन केलं.

बालगंधर्व येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इराणी आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या सभागृहात अचानक गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजपच्या (BJP) कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्मृती इराणींविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी कोंग्रेस (NCP) महागाई विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. इराणी यांच्या विरोधात घोषणा यावेळी देण्यात येत आहेत.

पुण्यातील जे डब्लू मॅरीयेट या हॉटेल बाहेर राष्ट्रवादीने आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादेच कार्यकर्ते आक्रमक झालेत. इराणी यांना महागाईचे निवेदन देणार असल्याचे महिला सांगत आहेत. हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे.पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलकांनी गॅसच्या टाक्या तसेच इराणी यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत आहेत.

आंदोलन सुरु असताना पोलिसांना कार्यकर्त्यांना ताब्यत घेतलं. यावेळी आंदोलक आक्रमक झाले. स्मृती इराणी यांचा हॉटेलमध्ये कार्यक्रम सुरु आहे. त्यांचा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजून एक कार्यक्रम आहे. पण या गोंधळामुळे इराणी हॉटेलमध्ये अडकून पडले आहे.

राष्ट्रवादीचे NCP) कार्यकर्ते इराणी यांना निवेदन देण्यावर ठाम आहेत. आम्ही त्यांना निवेदन देणार असल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत. तर पुढील कार्यक्रम बालगंधर्व येथे आहे. बालगंधर्व येथेही काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित आहे. तिथेही महागाई विरोधात काँग्रेसने (Congress) आंदोलन सुरु केले आहे.

महागाई संदर्भात आंदोलकांनी पोस्टर आणले आहेत. यात त्यांनी स्मृती इराणी यांनी २०१४ पूर्वी केलेल्या आंदोलनाचे फोटो आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply