पुणे : शिवाजीनगरला होणार मल्टिमोडल ट्रान्स्पोर्टेशन हब

पुणे - शिवाजीनगरला मल्टिमोडल ट्रान्स्पोर्टेशन हब करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. वाकडेवाडी येथे स्थलांत्तरित झालेले एसटी बसस्थानक आता परत शिवाजीनगरला होण्यावर एसटी व मेट्रो प्रशासनात एकमत झाले आहे. त्यामुळे एसटी बसस्थानक, मेट्रो, रेल्वे, पीएमपी अशा सेवा प्रवाशांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत. बसस्थानकाच्या उभारणीचा खर्चदेखील एकत्रितरीत्या करण्यावर दोन्ही संस्थांमध्ये सहमती आहे. यासाठी सुमारे ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नवे बसस्थानक उभारताना त्यावर दहा मजली व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे नियोजन आहे.

एसटी व मेट्रो प्रशासन यांच्यात याबाबत दोन बैठका झाल्यानंतर मेट्रोने नरमाईची भूमिका घेत एसटी प्रशासनाच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. शिवाय बसस्थानकाच्या खर्चालादेखील होकार दर्शवला आहे. त्यामुळे मूळ जागीच या दोन्ही संस्था बसस्थानकाच्या उभारणीचा खर्च करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाने शिवाजीनगर बसस्थानकावर मल्टिमोडल ट्रान्स्पोर्टेशन हब उभारण्याचे प्राथमिक स्तरावर नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना येथूनच मेट्रो व रेल्वे तसेच पीएमपीच्या बसने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. स्वारगेट बसस्थानकाच्या बाबतीत असेच नियोजन आहे. मात्र याच्या कामास अद्याप सुरवात झालेली नाही.

देशातील काही महत्त्वाच्या शहरांत अशी हब प्रस्तावित आहेत. यात ग्रेटर नोएडा, बंगळुरू व ठाणे आदी शहरांचा समावेश आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply