पुणे शहरामध्ये उकाडा वाढला

पुणे - शहर आणि परिसरात उकाड्याचे प्रमाण चांगलेच वाढले असून दिवसा बाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असून तीन-चार दिवसांपासून शहर आणि परिसरात कमाल तापमान ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान नोंदले जात होते. पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. त्यामुळे एप्रिलची सुरवातच उबदार होणार आहे.

शहरात गुरुवारी ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तर १५.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. यातच आता अधून-मधून अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने किमान तापमानही हळू-हळू वाढेल.

राज्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्यावर पोचले असून येत्या शुक्रवारी (ता. १) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गुरुवारी चंद्रपूर, वर्धा व अकोला येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे, तर सोलापूर, वाशीम, नागपूर, यवतमाळ येथे तापमान ४२ अंशांच्या वर होते. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असेल. राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार असून उन्हाच्या चटक्यांची तीव्रता अधिक वाढणार आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

१ एप्रिल - जळगाव, नगर, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर

२ एप्रिल - औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड

३ एप्रिल - बुलडाणा, अकोला

४२ अंशांच्या वर तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • चंद्रपूर - ४४
  • मालेगाव - ४३.४
  • अकोला - ४३.१
  • वर्धा - ४३.२
  • अमरावती - ४२
  • नागपूर - ४२



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply