पुणे - पुणे महापालिकेच्या सभागृहाचा (ता. १४) अखेरचा दिवस असणार आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू होणार आहे. दरम्यान, उद्या शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.
कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या.
त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीत वाद होण्याची शक्यता
सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे.
सुविधा काढून घेणार
मंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.
स्थायी समितीत काय होणार?
स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे. उद्याच्या बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक
मार्च २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री संपणार आहे, त्यामुळे विद्यमान नगरसेवक आपोआप माजी नगरसेवक होणार आहेत. १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रमकुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज सांभाळणार आहेत. पुणे महापालिकेच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच प्रशासक येणार असल्याने त्यांच्या कामकाजाची पद्धत कशी असणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पिंपरी पालिकेतही आजपासून ‘प्रशासकराज’
कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक वेळेत झाली नाही. रविवारी (ता. १३) मध्यरात्री बारा वाजता मुदत संपली. त्यामुळे सोमवारपासून (ता. १४) प्रशासकराज सुरू झाले. त्यांचा कालावधी निश्चित नाही. मात्र, महापालिका निवडणूक झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा होईपर्यंत प्रशासकाच्या हाती कारभार राहणार आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार पिंपरी महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आयुक्त आणि प्रशासक अशा दोन्ही भूमिकेत ते असतील.
महापालिकेच्या शेवटच्या दिवशी मुख्य सभा आणि स्थायी समितीची बैठक आहे. तसेच मंगळवारपासून प्रशासक येणार असल्याने पुढील कार्यवाही कशी करायची, याबद्दल आयुक्तांशी चर्चा केली जाईल.
- शिवाजी दौंडकर, नगरसचिवहे पण वाचा-
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- बारावी निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे निर्देश; गुणपत्रिकेवर फोटोबाबत नियमावली जारी!
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ


























Subscribe to my channel




