पुणे - नाशिकची (Nashik) द्राक्षे, कांदा आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ (Pune Market) मिळू शकणार आहेत. हे शक्य होणार आहे ते सेमी हायस्पीड रेल्वेमुळे. (High Speed Railway) पुणे-नाशिक या २३५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.
पुणे आणि नाशिक हा राज्यातील सर्वांत श्रीमंत असा औद्योगिक आणि कृषी पट्टा आहे. या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) सेमी हायस्पीड रेल्वे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याबरोबरच वेळ, इंधनाची बचत तसेच प्रदूषण कमी होण्याबरोबरच कृषी व औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे.
या पट्ट्यातील प्रमुख कृषी उत्पादने
- पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, मंचर, आळेफाटा येथील भाजीपाला, द्रक्षे, कांदा,फळे व फुले देशाच्या विविध भागांत पाठविली जातात
- रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस पन्नास किलोमीटरच्या परिसरात दूध उत्पादन, भाजीपाला, फळे आणि ऊस या प्राथमिक उत्पादक कंपन्यांना फायदेशीर
- मंचर, जुन्नर, संगमनेर, सिन्नर येथे उसावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने आहेत. त्यांना फायदा होणार
- विविध कृषी, दूध प्रक्रिया केंद्र व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना
- नाशिकमधील ऊस, कांदा अन्य भागात पाठविणे शक्य होणार
रेल्वेमार्गामुळे होणारे फायदे
- शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार समितीपर्यंत पोचविणे शक्य
- माल वाहतूक जलद व कमी दरात होणार
- नाशवंत मालासाठी पार्सल व्हॅनची सुविधा
- पुण्यासह देशातील बाजारपेठेत माल पाठविण्यासाठी मार्ग उपयोगी ठरणार
- पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर माल पाठविणे शक्य
- ८० टक्क्यांनी अन्नधान्याच्या वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता
- प्रकल्प उभारणीच्या काळात किमान २५ हजार लोकांना रोजगार मिळणार
- जमिनींच्या दरात मोठी वाढ होणार
मार्गावर वीस स्थानके
पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंभोरे, संगमनेर, अमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मोहदरी, वडगाव पिंगला, नाशिक रस्ता.
प्रकल्पासंबंधी
- प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटी रुपये
- पुणे, नगर आणि नाशिकमधील १,४७० हेक्टर जमिनीचे संपादन होणार
- त्यापैकी केंद्र व राज्य प्रत्येकी २० टक्के, तर ६० टक्के कर्ज रूपात
- भूसंपादन बाजारभावाने व थेट खरेदीने होणार
- रेल्वे मार्ग ओलंडण्यासाठी प्रत्येक ७५० मीटर अंतरावर ये-जा करण्याची सुविधा असणार
स्थानके आणि त्यांची वौशिष्ट्ये
चाकण
- हे प्रमुख मालवाहतूक भंडार स्थानक असणार आहे.
- प्रवाशांच्या सोयीसाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला लागून स्थानक असणार
- रेल्वे सायडिंग, ऑटोयार्ड, लोडिंग आणि गोदाम सुविधा असणार
राजगुरूनगर
- हे स्थानक प्रवासी वाहतुकीसाठी आहे.
- विशेष आर्थिक क्षेत्राला हे स्थानक जोडणार
मंचर
- बाजार समिती असल्यामुळे प्रवाशांबरोबरच कृषी उत्पादनांची माल वाहतूक सोयीची ठरणार
- मंचर ते चिंचोली रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणार
नारायणगाव
- कृषी उत्पादने व खासगी माल वाहतूक स्थानक म्हणून विकसित होणार
- टॉमेटो, कांदा आणि बटाटा देशाच्या विविध भागात पाठविणे शक्य होणार
- स्थानक महामार्गाला जोडले जाणार आहे
संगमनेर
- राज्य महामार्गाला जोडणार
- दूध उत्पादन, प्रवासी वाहतूक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व भाजीपाला वाहतुकीला चालना मिळणार
सिन्नर
- मालवाहतूक भांडार स्थापन केले जाणार
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हे स्थानक फायदेशीर ठरणार
नाशिकरोड
- जिल्ह्यातील कृषी उत्पादने देशभर पाठविणे सोयीचे होणार
-
नाशिक-मनमाड रेल्वे मार्गावर हे स्थानक असणार
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



