नारायणगाव : येथील वैदवस्ती (ता. जुन्नर) येथून बेपत्ता झालेल्या व नारायणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या विवाहित महिलेचाशोध लावण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. सदर विवाहित महिला व दोन तरुणांना नारायणगाव पोलिसांनी नगर येथून ताब्यात घेतले आहे. या अपहरणनाट्याचा छडा नारायणगाव पोलिसांनी चार तासात लावला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विवाहिता शितल मयुर शिंदे( वय २४, राहणार वैदवस्ती,नारायणगाव), महेश लोखंडे , राहूल कनगरे ( दोघेही राहणार राहूरी) यांना ताब्यात घेतले आहे.आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
वैदवस्ती येथील शितल शिंदे या विवाहित महिलेला ६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी येथील नारायणगाव -जुन्नर रस्त्यावर मोटारीत जबरदस्तीने बसवून पळवून नेले असल्याची तक्रार विवाहितेचा पती मयूर गोविंद शिंदे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे ,सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दुर्वे, सचिन कोबल, शैलेश वाघमारे, दिनेश साबळे, दिपक साबळे, होमगार्ड अक्षय ढोबळे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.
अपहरणासाठी एम एच ०४ डीडब्ल्यू ६८७३ या वाहनाचा वापर केला असल्याचे सीसीटीव्हीच्या आधारे निष्पन्न झाले. मोटारीच्या नंबर वरून वाहनाचा मूळ मालक नगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी नगर येथे जाऊन वाहनाच्या मूळ मालकाकडे चौकशी केली असता महेश लोखंडे व राहूल कनगरे हे माझी मोटार घेऊन गेले असून सायंकाळी पाच वाजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस पथकाने सापळा रचून मोटारीसह शितल मयुर शिंदे, महेश लोखंडे , राहूल कनगरे यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नगर येथून ताब्यात घेतले. चौकशीत अपहरण नसून अपहरणनाट्य असल्याचे निष्पन्न झाले. राहुरी येथील शितल हीचा विवाह दोन वर्षा पूर्वी तिच्या इच्छेविरुद्ध मयुर शिंदे याच्याशी झाला होता.या मुळे शितल तीचे मित्र महेश लोखंडे , राहूल कनगरे यांच्या सोबत सहा मार्च रोजी दुपारी एक वाजता निघून गेली होती.अपहरण झाल्याचा बनाव शितल व तीचे मित्र महेश लोखंडे , राहूल कनगरे यांनी संगनमताने केला होता. या संवेदनशील प्रकरणाचा तपास तातडीने करून पोलिसांनी सत्य उघडकीस आणल्याने नारायणगाव परिसरात चर्चा सुरू असलेल्या या अपहरणनाट्यावर अखेर पडदा पडला.
शहर
- जिद्दीची यशोगाथा! दुष्काळी गावातील शेतकरी कन्येची गरुडझेप; आकांक्षा वाळुंज झाली 'डॉक्टर'!
- मुंबईतील गरजू महिलांना मिळणार मोठा आधार; 'स्वाभिमानी निधी' योजनेद्वारे दरमहा २,००० रुपये देण्याचा पालिकेचा मास्टर प्लॅन!
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
महाराष्ट्र
- जिद्दीची यशोगाथा! दुष्काळी गावातील शेतकरी कन्येची गरुडझेप; आकांक्षा वाळुंज झाली 'डॉक्टर'!
- मुंबईतील गरजू महिलांना मिळणार मोठा आधार; 'स्वाभिमानी निधी' योजनेद्वारे दरमहा २,००० रुपये देण्याचा पालिकेचा मास्टर प्लॅन!
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


