
नागपूर : कालपासून नागपूरकरांना हुडहुडी भरली असून गुरुवारी दुसऱ्या दिवशीही २.१ अंशाने तापमानात घट झाल्याने नागपूरकरांना घरातही उब देणाऱ्या कपड्यांसह वावरावे लागले. शहरातील अनेक भागात दुपारीही शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब घेतली. दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच शहरावर धुक्याची चादर पसरली होती. अनाहूतपणे आलेल्या धुक्यांमुळे नागपूरकरांना शहरातच ‘हिल स्टेशन’चा ‘फिल’ आला. आज शहरातील काही भागात कारंजे उडाल्याप्रमाणे हलके तुषार उडत असल्यासारखी
पावसाने हजेरी लावली. याचा वातावरणावर परिणाम होणार असून शनिवारपासून थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री शहराचे तापमान १७.२ असे नोंदविण्यात आले होते. आज पावसाळी वातावरण असल्याने तापमानात चांगलीच घट झाली. याशिवाय सकाळपासूनच धुक्यांनीही शहर व्यापले. त्यामुळे दिवसभर बोचरी थंडी, धुके यामुळे नागपूरकरांनी आज सिमला, उटी, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणांची अनुभूती घेतली.
धुक्यामुळे अनेकांनी फुटाळा, अंबाझरी तलावावर फिरण्याचा आनंद लुटला. धुक्यात मॉर्निंग वॉकचा अनेकांनी आनंद लुटला. पावसाळी वातावरण व धुक्यामुळे आजही नागपूरकरांंना सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. एकूणच या वातावरणामुळे नागपूरकरांचा दिवस आल्हाददायक गेला. पावसाळी वातावरणामुळे दिवसाच्या कमाल तापमानात कमालीची घट होऊन उन्हच गायब झाले आहे.
२.१ अंशानी तापमानात घट
बुधवारच्या तापमानाशी तुलना केल्यास २.१ अंशानी गुरुवारी तापमानात घट झाली. आज १५.१ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे घर, कार्यालयांमध्ये उनी कपडे घालूनच नागरिक दिसले. थंडीमुळे अनेकांनी दुचाकीने प्रवास टाळून चारचाकी बाहेर काढली. त्यामुळे रस्त्यांवरही चारचाकी वाहनांची गर्दी दिसून आली. पानटपरी, चौकांमधील चहाटपरीच्या बाजूला अनेकांनी शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
नागपूर उपराजधानीत गुरुवारी थंडीमुळे दिवसभर धुक्यांसह गारेगार वातावरण होते. यामुळे कधी नव्हे ते नागपूरकरांना ठेवणीतील उबदार कपडे, हातमोजे, कानटोपरे घालूनच कार्यस्थळी जावे लागले. दिवसभर आपण कुलू मनाली, शिमल्यात तर नाही ना असा भास होत होता. शहरातील फुटाळा तलावावरही धुक्याची चादर पसरली होती. काहींनी शेकोटी पेटवून थंडी पळवण्याचा प्रयत्न केला.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


