नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आज तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २२ रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली. काल शुक्रवारी ३,५४५ रुग्णांची भारतात नोंद झाली होती. 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या चोवीस तासात ३,८०५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळं देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४,३०,९८,७४३ वर पोहोचली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०,३०३ असून जी एकूण रुग्णांच्या तुलनेत ०.०५ टक्के आहे. गेल्या चोवीस तासातील २२ रुग्णांच्या मृ्त्यूंची भर पडल्यानं देशातील कोरोना रुग्णांच्या एकूण मृत्यूची संख्या ५,२४,०२४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, देशातील कोरोना रिकव्हरीचा रेट ९८.७४ टक्के असून गेल्या चोवीस तासात ३,१६८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं देशातील रुग्ण बरे झाल्याची एकूण संख्या ४,२५,५४,४१६ इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ४,८७,५४४ रुग्णांच्या तपासण्या पार पडल्या. यामुळं देशातील दररोजचा पॉझिटिव्हीटी दर ०.७८ टक्के तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ०.७९ टक्के आहे.

आत्तापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेत १९० कोटी कोरोनाचे लसीकरणाचे डोस पार पडले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply