IPL 2022: कोहली पुन्हा होणार कर्णधार? वरिष्ठ खेळाडूच्या वक्तव्याने चर्चेला ऊत

आयपीएलच्या 15 व्या हंगामात सर्वाधिक लक्ष हे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे  असणार आहे. त्याने गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या कर्णधार पदाचा  राजीनामा दिला होता. त्यानंतरची ही त्याची पहिलीचआयपीएल असणार आहे. त्याच्या डोक्यावरचा कॅप्टन्सीचा काटेरी मुकूट आता उतरला असल्याने तो फलंदाजीत आपल्या जुन्या लयीत परतण्याची अपेक्षा चाहते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसिस हा विराट कोहलीचा उत्तराधिकारी असणार आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने विराट कोहली पुढच्या वर्षी पुन्हा आरसीबीचा कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

चेन्नई सुपर किंग्जचा  अनेक वर्ष महत्वाचा भाग असलेल्या फाफ ड्युप्लेसिसला आरसीबीने यंदाच्या लिलावात 7 कोटी रूपयाला खरेदी केले. याचबरोबर त्यांनी त्याला आपल्या संघाचे कर्णधार देखील केले. मात्र आरसीबीच्या या निर्णयावर काही लोकांनी शंकाही उपस्थित केली. कारण फाफ ड्युप्लेसिस हा 37 वर्षांचा खेळाडू आहे. त्याचा सध्या तरी फिटनेस तगडा असला तरी तो फार काळ आरसीबीसाठी उपयुक्त ठरेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आरसीबीसाठी तो दीर्घ काळचा कर्णधार होणे शक्य नाही.

दरम्यान, यंदाचा आयपीएल हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्याआर अश्विनने याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'त्याला कर्णधार करण्याचा चांगला निर्णय आरसीबीने घेतला. त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. तसेच त्याच्या नेतृत्वावर धोनीची छाप देखील पहावयास मिळेल.फाफ ड्युप्लेसिसची आयपीएल कारकिर्द ही उतरणीला लागली आहे. तो अजून दोन ते तीन वर्षे खेळू शकतो. '

अश्विन पुढे म्हणाला की, 'मला असे जाणवते की विराट कोहलीवर गेल्या काही वर्षापासून कॅप्टन्सीचा चांगलाच ताण होता. या वर्षी तो कॅप्टन्सीमधून ब्रेक घेईल. माझा असा अंदाज आहे की आरसीबी त्याला पुढच्या वर्षी पुन्हा कर्णधार करेल.' विराट हा आरसीबीचा 2013 पासून कर्णधार आहे हे अश्विनने अधोरेखित केले. विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार असताना फलंदाज म्हणून खोऱ्याने धावा केल्या. मात्र त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. आता आरसीबी या हंगामात कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply