नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची बदली …

नाशिक : एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला वर्ग करण्याचा नियम आहे. महापालिकेने त्याचे उल्लंघन करत यासंदर्भात म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविली. त्याची विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.

म्हाडाच्या नियमानुसार चार हजार चौरस मिटरहून अधिक क्षेत्रावरील बांधकाम प्रकल्पातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल व अन्य घटकांसाठी म्हाडाकडे वर्ग करण्याचा नियम आहे. मात्र नाशिक महापालिकेत त्याचे उल्लंघन झाले आहे. याबाबत आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर गंभीर चर्चा झाली. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री आव्हाड यांनी चौकशीचे आश्‍वासन दिले. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply