नवी मुंबईत एफडीएची धडक कारवाई: महापे एमआयडीसीत दुध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, १५ जणांवर गुन्हे दाखल



Continue Reading

डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:शिक्षण महाग झाले तर आपण‎ आपले भविष्य कसे घडवणार?‎


This post was originally published on this site.


Continue Reading

पलकी शर्मा यांचा कॉलम:शेजारी देशासाेबतच्या संबंधांमध्ये‎ भारतासाठी समंजसपणा गरजेचा‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎बांगलादेश भारतासाठी एक अडचण बनत चालला‎आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे आता कठीण होत‎आहे. सध्या सर्वात मोठा मुद्दा बांगलादेशचे पंतप्रधान‎तारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याचा आहे.‎भारताने त्यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे. खरे तर दोन‎निमंत्रणे आहेत—एक द्विपक्षीय दौऱ्याचे आणि दुसरे‎ब्रिक्स परिषदेचे. तरीही रहमान भारतात येणार का,‎याबद्दलचा गोंधळ रोज वाढत चालला आहे.‎ ऑगस्टच्या शेवटी ते येतील अशी अपेक्षा होती. पण नंतर‎शेख हसीना यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नव्या‎सरकारवर बांगलादेश उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला.‎दुसरीकडे, रहमान यांच्या मंत्र्यांनी भारतावर हसीना यांना‎पाठिंबा दिल्याचा आरोप केला. यामुळे हा दौरा‎लांबणीवर पडला. आता रहमान यांच्या सल्लागारांचे‎म्हणणे आहे की, त्यांचा पहिला भारत दौरा हा द्विपक्षीयच ‎‎असावा. यामुळे ब्रिक्स परिषदेतील त्यांच्या सहभागाची ‎‎शक्यता संपल्यासारखीच आहे. तर दुसरीकडे द्विपक्षीय‎दौरा अजूनही अनिश्चित आहे. रहमान यांच्या‎दौऱ्याबाबतचा हा गोंधळ दोन्ही देशांतील अनिश्चित ‎‎संबंधाचाच पुरावा आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती ‎‎म्हणजे आता हसीना यांच्या काळातील जुन्या दिवसांत‎परत जाणे शक्य नाही. हसीना यांचा कार्यकाळ दोन्ही ‎‎देशांतील अत्यंत जवळीक, विश्वास आणि सहकार्याचा‎होता. ढाका हा भारताचा विश्वासू भागीदार होता. आता‎मात्र गणिते बदलली आहेत. आज तिथे उदारमतवादी‎आणि धर्मनिरपेक्ष पक्षासाठी फारशी जागा उरलेली नाही.‎तसेच मतदारांच्या एका वर्गात भारताविषयी संशय‎वाढला आहे. हसीना आजही पुनरागमनाच्या गप्पा‎मारतात, पण सध्या तरी ते अशक्य दिसते. सुरवातीला‎रहमान यांची भूमिका भारताबाबत तर्कसंगत व संतुलित‎वाटत होती. पण अलीकडचे संकेत चिंताजनक आहेत.‎पाकिस्तानसोबत काम करण्याची बांगलादेशची वाढती‎उत्सुकता चिंतेची बाब आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण‎म्हणजे ‘इस्लामिक नाटो” म्हटले जाणाऱ्या आघाडीतील‎ढाकाचे स्वारस्य. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि‎तुर्किये यांनी एका परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली‎आहे. या करारानुसार, या तिन्हींपैकी एका देशावर‎झालेला हल्ला सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल.‎बांगलादेशने आता म्हटले आहे की, या तीन देशांशी‎जोडलेल्या कोणत्याही आर्थिक किंवा लष्करी चौकटीत‎सामील होण्याबाबत त्यांची भूमिका सकारात्मक आहे.‎असे झाले तर 1971 चा इतिहास व मुक्तीसंग्राम काळात‎पाकिस्तानी सैन्याने केलेला नरसंहार यानंतरही हे दोन्ही‎देश एकाच लष्करी आघाडीत येऊ शकतात. ही‎परिस्थिती रणनीतिकदृष्ट्या भारतासाठी अस्वस्थ‎करणारी आहे. सध्या हा कथित ‘इस्लामिक नाटो” गट‎प्रामुख्याने पश्चिम आशियापुरता मर्यादित आहे. ते थेट‎भारताच्या विरोधात दिसत नाही. पण बांगलादेश त्याचा‎सदस्य होताच संपूर्ण परिस्थिती बदलेल. मग हा गट‎दक्षिण आशियात आणि पर्यायाने भारताच्या पूर्व‎सीमेपर्यंत येऊन पोहोचेल. बांगलादेश परराष्ट्र धोरणाचा‎विस्तार करत आहे. हे पुढेही सुरू राहील. या दुसऱ्या‎वास्तवासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल.‎बांगलादेश हा महत्त्वाचा किनारपट्टीचा 17.8 कोटी‎लोकसंख्येचा देश आहे. गेल्या दोन दशकांतील त्याची‎आर्थिक प्रगतीही प्रभावी राहिली. अमेरिका , चीन तिथे‎आपला प्रभाव पाडू पाहतोय. युरोपलाही तिथे आपला‎हिस्सा हवा आहे. आता पश्चिम आशियातील शक्तीही‎या समीकरणात सहभागी होत आहेत. हसीना यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎काळातही बांगलादेश आपले परराष्ट्र धोरण व्यापक करत‎होता. रहमान यांच्या काळात ही प्रक्रिया आणखी वेगवान‎होण्याची शक्यता आहे. भारत हे रोखू शकत नाही.‎बांगलादेशने इतर देशांना दूर ठेवून फक्त भारताचीच‎निवड करावी, अशी अपेक्षा भारत करू शकत नाही.‎परंतु, स्वतःचे हितसंबंध जपणे आणि थेट भारताच्या‎सुरक्षेवर परिणाम करणारा रणनीतिक पर्याय निवडणे यात‎फरक आहे. पाकिस्तानशी जोडलेला आणि भारताच्या‎पूर्व शेजारापर्यंत पोहोचणारा कोणताही लष्करी करार हा‎दुसऱ्याच श्रेणीत येईल. आपल्याला सावधगिरीचा‎समतोल साधावा लागेल—शत्रुत्वाशिवाय सतर्कता ,‎संवाद ठेवावा लागेल. काही दिवसांपूर्वी भारतीय‎उच्चायुक्तांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींना रहमान‎यांचा भारत दौरा ‘संस्मरणीय” करायचा आहे. कदाचित‎भारत व्यक्तिगत मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत आहे. ही‎वाईट कल्पना नाही. कारण राजकीय उलथापालथ‎असूनही या नात्याचा पाया अजूनही मजबूत आहे.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )‎ भारताचे ध्येय जुना बांगलादेश परत‎मिळवणे हे नाही. भारताला आता नव्या‎बांगलादेशसोबत काम करण्याचा नवा‎मार्ग शोधावा लागेल. बांगलादेश जास्त‎स्वतंत्र आहे. तेथे जास्त विविधता आहे.‎तो आपल्याशी पूर्णपणे मैत्रीपूर्ण नसला,‎तरीही एक महत्त्वाचा शेजारी देश आहे.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तरुण वयात चारित्र्य समजून‎ घ्या, आपल्या तेजाचा वापर करा


This post was originally published on this site.


Continue Reading

थोर विदुषीचे जाणे!:प्रा. यास्मिन शेख म्हणजे विलक्षण भाषिक बुद्धिमत्तेचा वस्तुपाठ; वाचा डॉ. नागेश अंकुश यांचा लेख…!


This post was originally published on this site.


Continue Reading

कल्याणमध्ये खासगी रुग्णालयात डॉक्टरवर बेदम हल्ला; उपचारावरून झालेल्या वादातून रुग्णाच्या मुलाने केबिनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद



Continue Reading

साखरेचे दर उच्चांकी पातळीवर! दिवाळीपूर्वीच सामान्यांचे कंबरडे मोडले; महागाईमुळे गोडवा हरवण्याची भीती



Continue Reading

मुंबई महापालिकेची मोठी कारवाई; महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात १० दुर्मिळ झाडे बेकायदा तोडल्याचे उघड, गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश



Continue Reading

गुन्हा घडण्याआधीची खबर कुठे हरवते? वाढत्या गुन्हेगारीने उघड केली पोलिसांच्या 'डीबी' पथकाची पोलखोल



Continue Reading