
मुंबई : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. मुंबईतील ठिकठिकाणच्या मानाच्या गणपतींचे विसर्जन सकाळपासून सुरू झाले आणि अवघी मुंबापुरी गणेशाच्या गजराने दुमदुमली आहे.
लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनच्या गणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लालबाग परिसरात भाविकांची अलोट गर्दी केली आहे. फटाक्यांची आतशबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. लालबाग परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि भाविकांची गर्दी वाढू लागली. त्याच वेळी लालबागच्या राजाची आरती सुरू झाली. आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाचा रथ खेचण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लालबागच्या बाजारपेठेतून लालबागचा राजा बाहेर पडला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उभ्या असलेल्या भाविकांनी एकच जल्लोष केला. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईसह अन्य शहरांतूनही भाविक आले आहेत. लालबाग, परळ आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गावर मार्गस्थ होऊ लागल्या. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक कोंडी झाली. परिणामी वाहतून अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरूवात होताच गिरगाव, खेतवाडीसह आसपासच्या मंडळांमध्ये गणेश विसर्जनाची लगबग सुरू झाली असून गिरगावातील मानाचे गणपती अशी ओळख असलेले एस. व्ही. सोहनी पथ येथील गिरगावचा राजा आणि मुगभाटमधील गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.
शहर
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
महाराष्ट्र
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


