
पुणे : शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे. यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना रुपाली पाटील म्हणाल्या, “गुलाबराव पाटील हे मूळ व्यवसायाने पानाला चुना लावणारे आहेत. कुठलाही व्यवसाय वाईट नसतो, परंतु पानटपरी ते मंत्रीपदार्यंतचा जो प्रवास आहे. त्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही. आपण कोणत्या कार्यक्रमात कुठलं उदाहरण देतोय, याचं भान मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे. परंतु मूळातच मी सांगते की, जे हे गद्दार मंत्री आहेत यांना कुठलाही बुद्धीमत्तेचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचं कोणतंही एक धोरण जर तुम्ही दाखवलं, तर मी म्हणाल ते हारेल. पुन्हा गुलाबराव पाटलांना म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलं, की स्त्री रोग तज्ज्ञ हे हातपाय बघत नाहीत म्हणजे हा काय तर्क झाला. मला वाटतं ते हातपाय नसू दे बघत पण तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात परत मंत्रीपदावरून पानटपरीवर चुना लावायला बसावं लागणार आहे.”
तसेच, “काय उदाहरण देताय, काय आदर्श ठेवताय अक्षरशा लाजीरवाणी गोष्ट आहे. कुणाचे दौरे कसे असतात, कुणाचं वक्तव्यं काय आहे. मुख्यमंत्री शिंदेंना मला विचारायचं आहे की, अशी अडाणी लोक घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात का? की जे सतत वाक्यातून, कृत्यातून महाराष्ट्राचा, महिलांचा अपमान होईल. असं सातत्याने करणाऱ्या लोकांपासून खरंच महाराष्ट्र वाचवला पाहिजे आणि धन्य आहेत गुलाबराव पाटील तुम्ही परत चुना लावायला टपरीवर या.” असंही रुपाली पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.
गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर आणि मंत्र्यांमधील साधर्म्य सांगताना भाषणादरम्यान हे विधान केलं आहे. “एक हजार लोकांची ओपीडी होती. त्याचा निकाल आठ ते दहा असा दोन तासात लावला. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा (मंत्र्यांपेक्षा). जनरल फिजिशियन, आर्थोपेडिक, हृयदरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ. स्त्रीरोग तज्ञ असतात. स्त्रीरोग तज्ञ कधी हात-पाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




